श्रवणयंत्रांचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात; कानामागे घालण्याची श्रवणयंत्रे व कानाच्या आत घालण्याची श्रवणयंत्रे.
कानामागील घालण्याची पारंपारिक श्रवणयंत्रे BTE-( Behind The Ear) असो किंवा RIC ( Receiver In canal) असो, कोणत्याही कंपनीचं श्रवणयंत्र थोड्या फार फरकाने (आकार, रंग) साररखच दिसतं. तिच गोष्ट आहे कानातील श्रवणयंत्रांची. कानातील श्रवणयंत्रात श्रवणयंत्रांचा आकार कानाच्या आकारावर अवलंबून असला (कारण ती कानाचे माप घेऊन त्यानुसार प्रत्येकाकरीता बनवली जातात) तरी ती एकसारखीच भासतात. मग ती वेगळी कशी ?
सारख्याच दिसणाऱ्या श्रवणयंत्रांमधला वेगळेपणा दोन गोष्टींमुळे उजागर होतो :
१) तंत्रज्ञान सापेक्ष
२) व्यक्तीसापेक्ष.
श्रवणयंत्रे वेगवेगळे तंत्रज्ञान वापरतात. वेगवेगळ्या कंपन्या तर वेगवेगळे तंत्रज्ञान वापरतातच पण एकाच कंपनीच्या दोन श्रवणयंत्रांमधील तंत्रज्ञान आणि पर्यायाने आवाज मोठी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते . कंपनी आपल्याच दोन प्रकारच्या श्रवणयंत्रांमध्ये देखिल वेगवेगळे तंत्रज्ञान वापरत असते.
यामुळेच एखादया व्यक्तीला एकाच कंपनीच्या, सारख्याच दिसणाऱ्या श्रवणयंत्रांतून मिळणारा ऐकण्याचा अनुभव पूर्णपणे वेगळा असू शकतो. उदा. एखादया तंत्रज्ञानाच्या वापराने कुठूनही येणारा आवाज मोठा होतो पण दुसऱ्या एखादया तंत्रज्ञान प्रणालीमुळे फक्त समोरून येणारा आवाजच मोठा होतो आणि तो योग्य त्या ठिकाणी, गरजेप्रमाणे निवडण्याचे स्वातंत्र्य सुद्धा वापरणाऱ्या व्यक्तीला असते.
जसे एखादी मिटिंग, ज्यात बोलणारी व्यक्ती आपल्या समोर असते. सेल्स प्रतिनिधी, बँकेतील कर्मचारी, दुकानातील विक्रेते हयांना हया सुविधेचा विशेष लाभ मिळतो त्यामुळेच सारखी दिसत असून देखिल श्रवणयंत्र अनुभव मात्र वेगवेगळा देतात.
दोन श्रवणयंत्र सारखीच दिसतात पण त्यातलं एक बटण सेलवर चालणार तर दूसरे रिचार्जेबल असू शकत. रिचार्जेबल श्रवणयंत्र मोबाईल प्रमाणे फक्त चार्ज करायचं असत. दर काही दिवसांनी बॅटरी बदलणे, किंवा प्रवासाला बाहेर जाताना बॅटरीजचा साठा आपल्याजवळ ठेवणे हे करण्याची गरज लागत नाही. वयस्कर लोकांना ज्यांना बॅटरी बदलणं सहजसाध्य वाटत नाही अशांना रिचार्जेबल श्रवणयंत्रे फारच उपयुक्त वाटतात.
आता अजून एका वेगळ्या तंत्रज्ञानप्रणालीमुळे बाह्यरुपाने सारखीच दिसणारी श्रवणयंत्रे खरतर कशी वेगळी कार्य करतात हे पाहू.
वायरलेस तंत्रप्रणाली वापरणारी आणि न वापरणारी. वायरलेस तंत्रप्रणाली वापरणारं श्रवणयंत्र ही खरच “काम की चीज है “
कारण त्यामुळे तुम्ही तुमचं श्रवणयंत्र कोणत्याही वायर शिवाय तुमच्या मोबाईल, टॅबलेट वा लॅपटॉपला जोडू शकता व अत्यंत सहजतेने फोनवर बोलू शकता, व्हिडिओ बघणे, मिटिंग घेणे, अगदी ऑनलाइन लेक्चर सुद्धा ऐकू शकता. विद्यार्थ्याकरीता तर ही अत्यंत उपयुक्त बाब आहे कारण वर्ग मोठा असतो,शिक्षक तुमच्याकडे बघत असतीलच असे नाही.
टि.व्ही देखिल दुसऱ्या कोणालाही वाढलेल्या आवाज चा त्रास होऊ न देता ऐकू शकता कारण टिव्हीचा आवाज सरळ तुमच्या श्रवणयंत्रांतून तुम्हाला ऐकू येतो. म्हणजेच दिसायला सारखच. परंतू एकात वायरलेस तंत्रज्ञान तर एकात नाही.
आता बघू श्रवणयंत्रामध्ये व्यक्ती सापेक्ष वेगळेपणा कसा असतो ते पाहूया :
श्री महाबळ आणि श्री चौधरी हे दोन मित्र, दोघांनाही त्यांच्या दोन्ही कानांत कमी ऐकू येते. दोघांनीही श्रवणतपासणी करून जवळ जवळ सारखच दिसणार आणि जवळजवळ सारखच तंत्रज्ञान असणारं श्रवणयंत्र घेतलं. श्री महाबळांना दोन्ही कानांनी एकाच वेळी व सारखं ऐकण्याचं महत्त्व पटले होते. यामुळे त्यांनी दोन्ही कानासाठी दोन श्रवण- यंत्रे घेतली पण श्री. चौधरींना मात्र वाटत होत की आधी एकाच कानांत श्रवणयंत्र लावू. मग चांगलं वाटलं तर दुसऱ्या कानाला लावू. त्यांनी एकच श्रवणयंत्र घेतल अर्थातच श्री चौधरी कधीच आपल्या ऐकण्याबाबत आनंदी राहिले नाहीत त्यांची एकच भावना की आमच्या दोघांच श्रवणयंत्र सारखच पण मला मात्र त्यांच्या इतका त्याचा फायदा होत नाही.
शाळेत जाणारी प्रियांका दोन्ही कानांत आनंदाने आणि जवळजवळ दिवसभर श्रवणयंत्रे लावते. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मधुराकडे पण तशीच श्रवणयंत्रे आहेत. पण तिला श्रवणयंत्र लावण्याची लाज वाटते त्यामुळे ती श्रवणयंत्रे फार कमी वापरते, वापरली तरी ती इतराना दिसणार नाहीत ना हीच चिंता तिला भेडसावत असते. परिणामी त्यांचा आत्मविश्वास सांगतो की दोघींना श्रवणयंत्राचा फायदा मात्र सारखाच होत नाहिये.
थोडक्यात पण महत्त्वाचे :