अर्थातच त्याची कारणं आहेत.
सतत एकाच कानात श्रवणयंत्र लावून त्याच कानाने ऐकल्यामुळे दुसऱ्या कानाने ऐकण्याचा सरावच राहत नाही. आपल्या मेंदूला त्या बाजूने आवाज येण्याची सवयच राहात नाही. हयाचा दूरगामी परिणाम गंभीर असू शकतो. ज्या कानावर एरवी एखादी व्यक्ती पूर्णपणे अवलंबून असेल आणि दुर्दैवाने भविष्यात त्या कानाला काही आजार झालाच तर त्या कानाने ऐकणे वा श्रवणयंत्र लावणे कठीण जाते व दुसऱ्या कानात कधीच श्रवणयंत्र न वापरल्याने या कानाला ऐकण्याची सवयच राहिलेली नसते. परिणामी, दोन्ही कानांनी पुरेसे ऐकू न आल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
दोन्ही कानांत श्रवणयंत्र वापरल्यास आवाज निश्चितच अधिक मोठा व स्पष्ट येतो. विशेषतः जिथे आजूबाजूला गोंगाट आहे, वर्दळ आहे अशा ठिकाणी. एकाच श्रवणयंत्रातून गोंगाट व बोलणे हे आवाज मेंदूपर्यंत पोचल्यास, बोलण्याचा आवाज, शब्द, उच्चार, स्वरांमधील चढ उतार ओळखणे मेंदूला खूपच जिकिरीचं जातं. त्याच्या मागचं हे शास्त्रिय कारण न समजल्याने एकच श्रवणयंत्र वापरणारे बरेच जण मग श्रवणयंत्रालाच दोष देत राहतात.
आपण दोन्ही कानांनी ऐकतो म्हणूनच केवळ आपल्याला आवाजाची दिशा व आवाजाचे आपल्यापासूनच अंतर हयाचे आकलन होते. आवाजाची दिशा कळणं, विशेषतः रस्त्यावर असताना, सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्विवादपणे आत्यावश्यक असतच पण ते इतरत्र सुद्धा तेवढेच गरजेचं असतं कारण त्यामुळे संभाषणात होणारा गोंधळ टाळता येऊ शकतो. एकाच वेळी दोन्ही कानात आवाज येणं खरतर पुरेसं नसतं, तर दोन्ही कानात येणारा आवाज हा सारखा देखिल असला पाहिजे. तसे असेल तरच त्या व्यक्तीला बोललेले समजेलच आणि ऐकण्याचा आनंद पण घेता येईल.
‘ऐकणं’ म्हणजे फक्त आवाज कानावर पडणं नव्हे ना. बोलण्याचा आवाज (मंजूळ, कर्कश्य. इ.) पट्टी, भावना व्यक्त करण्यासाठी बोलण्यात केलेले चढउतार हे सगळं समजण्यासाठी दोन्हीं कानांनी एकाच वेळेस, सारख्या प्रमाणात ऐकू येणे आवश्यक आहे.
कानांत श्रवणयंत्र वापरल्यावर आवाजाची पातळी देखील कमी ठेवून चालते. खरतर दुसऱ्या कानांतील श्रवणयंत्र चालू करताक्षणी आम्हाला लोक सांगतात आता आधीच्या श्रवणयंत्राचा (पहिल्या कानातील) आवाज लहान करा.
थोडक्यात दोन्ही कानांतील श्रवणयंत्रांमुळे :
हयामुळे ती व्यक्ती आत्मविश्वासाने कुठेही वावरू शकते. त्यांना कोणावरही अवलंबून रहावे लागत नाही.