श्रवणयंत्रांत रुजू झालेले वायरलेस तंत्रज्ञानामुळे तुमचं तुमच्या श्रवणयंत्रासोबत असलेल नातंच बदलून टाकणार आहे. कारण श्रवणयंत्र वापरणाऱ्या व्यक्तींना आधी करता न आलेल्या अनेक गोष्टी अगदी सहजपणे करता येणार आहेत—वायरलेस तंत्रज्ञानामुळे !
तुम्ही तुमचं श्रवणयंत्र आता कोणत्याही इतर उपकरणाशी जोडू शकता ते सुद्धा वायर्सच्या बंधनाविना!
तुमचा फोन, टॅबलेट, लॅपटॉप, कॉम्प्यूटर आणि अगदी टि व्ही देखिल तुमच्या श्रवणयंत्राशी जोडले गेल्याने हया उपकरणांमधून येणारा आवाज तुम्ही अगदी तुमच्या आरामदायी खुर्ची किंवा तत्सम स्थानावर बसून अधिक स्पष्टपणे ऐकू शकाल. हे कशामुळे शक्य होतं ? तर वायरलेस तंत्रज्ञानामुळे.
ब्लूटुथ हा शब्द तर आतापर्यंत प्रत्येकाने ऐकलेलाच असेल. ब्लूटुथ हे वायरलेस कनेक्शन (जोडणी) साठी वापरलं जाणारं मानक आहे, ज्याचा वापर कोणत्याही दोन उपकरणांमध्ये माहितीची देवाण घेवाण होण्याकरता केला जातो. आपण इथे विचार करतोय देवाणघेवाणीचा, जी आवाजाच्या (Audio) माध्यमातून होते आहे. हयासाठी दोन्ही उपकरणे एकमेकांपासून कमी अंतरावर असणे गरजेचे असते. जर मोकळी जागा असेल (अडसर नसेल तर हे अंतर १० मिटरपर्यंत पण जाऊ शकते.)
ह्या तंत्रज्ञानाच्या वापर करून तुम्ही एखादा व्हिडिओ, एखादे भाषण, एखादी शैक्षणिक माहिती, एखादे गाणं अगदी सहजपणे तुमच्या श्रवणयंत्रांमधून ऐकू शकता. इतकच नाही तर, श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तींना खूप इच्छा असते पण मनासारखं करता येत नाही ते म्हणजे फोनवरील संभाषण. अनेकदा फोनवरील बोलणे नीट समजत नसल्यामुळे, फोन स्पीकर वर ठेवला जातो ज्याचा इतरांना तर त्रास होतोच पण संभाषण वैयक्तिक देखिल राहात नाही.
अजून एक अत्यंत आकर्षक आणि उपयुक्त वाटावी अशी गोष्ट ह्या वायरलेस तंत्रज्ञानामुळे साध्य झाली आहे. ती म्हणजे तुमचा टिव्ही आणि तुमचे श्रवणयंत्र हयाची जोडणी.
तसं तर टि.व्ही सगळेच बघतात पण विशेष करून वयस्कर व्यक्तींचं टि.व्ही शी एक वेगळ्च नातं असतं (त्यांच्या करीता टि.व्ही त्यांचा सखा असतो, त्यांच्या साठी मनोरंजनाचं एक साधन असतं). श्रवणयंत्र लावणा-यांना मात्र टि.व्ही चा मनमुराद आनंद घेता येत नाही कारण कधी शब्दच ऐकू येत नाहित तर कधी आवाज लहानच वाटतो, मोठा केला तर जाहिरात सुरु झाल्यावर कर्कश्य होतो. घरातील इतरांना त्रास होतो तो वेगळाच पण श्रवणयंत्र लावलेल्या व्यक्तीला सुद्धा तो आवाज नकोसाच वाटतो. परंतू आता मात्र वायरलेस तंत्रज्ञानाच्या वापराने, एक छोटसं उपकरण वापरून, टिव्ही बघण्याचा आनंद घेणे शक्य होणार आहे. ते सुद्धा तुमच्या आवडत्या जागेवर बसून आणि इतरांना त्रास होऊ न देता.
विद्यार्थ्यांकरीता तर श्रवणयंत्रातील हे तंत्रज्ञान म्हणजे देणगी आहे. वर्ग आकाराने कितीही मोठा असू दे, वर्गात कितीही विद्यार्थी असू देत. शिक्षकांकडे एक छोटेसे उपकरण (External microphone) दिले की त्यांचा प्रत्येक शब्द विद्यार्थी थेट आपल्या श्रवणयंत्रांतून स्पष्टपणे ऐकू शकेल.
थोडक्यात :